दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला : तीन भाविक ठार

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंढरपूरवरून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन तीन जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला परतत असताना अगदी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळच मोठा अपघात घडला. आज दि.२२ सोमवार रोजी सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारा वर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली.

या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार तर ७ भावीक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलवण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झालायचे समजते.रात्री पासून हा प्रवास सुरु होता. आणि अगदी त्यांच्या घरापासून फक्त दोन किलो मीटर अंतर बाकी होते.

या भीषण अपघातामध्ये सुनंदा झाल्टे, शुभांगी सागर झाल्टे, ( रा.तरोडा ) व परशुराम गजानन लांजुळकर,रा.आळसणा हे तिघेजण ठार झाले. तसेच यात सात जण जखमी झाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content