साकेगावच्या सरपंच अपात्र : जात प्रमाणपत्राचे प्रकरण भोवले

साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी विहित वेळेत जात प्रमाणपत्र न सादर केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांना अपात्र ठरविल्यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

साकेगाव येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत योगिता विष्णू सोनवणे या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांनी अनुसुचीत जमाती या वर्गवारीतून उमेदवारी करत विजय संपादन केला होता. त्यांनी लागलीच आपल्या पदाचा कार्यभार देखील सांभाळला होता. दरम्यान, निवडणूक झाल्यानंतर त्यांनी विहीत वेळेत जात प्रमाणपत्र सादर केले नाही.

या अनुषंगाने अनंता एकनाथ सोनवणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी झाली. यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-१९५९च्या कलम १०-१-अ नुसार त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महसूल प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश पारीत करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content