महामार्गाचे चौपदरीकरणावरील सुरक्षा रक्षकांना दोन महिन्यांपासून पगार नाही (व्हिडीओ)

bhusawa111

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद गावाजवळील महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी कामाला असलेल्या ५० ते ६० सुरक्षा रक्षकांचा पगार होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव – भुसावळ दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. याठिकाणी सामानांवर देखरेखसाठी एबीपीएल कंपनीच्या ठेकेदार राय यांनी ५० ते ६० जणांची सेक्यूरीटी गार्ड म्हणून दोन महिन्यांपासून नेमणूक केली आहे. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या सेक्यूरीटी गार्ड कमचाऱ्यांना आयकार्ड, ड्रेस आणि बुट या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. तसेच दोन महिन्यापासून पगार देखील देण्यात आलेला नाही. ठेकेदार राय यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. दरम्यान सेक्यूरीटी गार्ड यांना ८ हजार ५०० महिना ठरलेला असतांना मध्ये ड्रेससाठी १२०० रूपये कापून काहींना पगार दिला आहे. या सुविधा ठेकेदारांने आपल्या स्वखर्चातूनच द्यावा लागतो असा नियम असतांना आमच्या पगारातून ही रक्कम कमी केली असल्याचे लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले. या ठिकाणी साकेगाव आणि इतर गावातील वयस्कर आणि तरूण काम करतात. पगाराबाबत विचारण केल्यास उडवाउडवीची उत्तरे ठेकेदाराकडून मिळत असल्याचे कामारांनी संताप व्यक्त केला.

 

 

Protected Content