भुसावळात स्‍मशान भूमी व घाटाचे बांधकाम,सुशोभीकरणाचे भूमिपूजन (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 08 at 5.44.31 PM

भुसावळ, प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा करून आमदार संजय सावकारे यांनी मंजूर करून घेतलेल्या तापी नदी काठावरील समशानभूमी व घाटाचे बांधकाम आणि सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज दि.६ सप्टेंबर रोजी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या या कामासाठी ६२लाख २७ हजार रुपये निधी मंजूर झाला असून त्यात ८लाख ४ हजार रु. संरक्षक भिंत व स्टेप २१ लाख ३ हजार रुपये, काँक्रिटीकरण रस्ता व पेव्हिंग ब्लॉक २७ लाख २६ हजार ७९६ रु.व लॉंन आणि बगीच्यासाठी ५ लाख ९२ हजार रु.खर्च करण्‍यात येणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमास नगराध्यक्ष रमण भोळे, हाजी शफी पहेलवान, प्रा.सुनील नेवे, हाजी मुन्ना तेली, युवराज लोणारी, मनोज बियाणी, पिंटू कोठारी, प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, राजू नाटकर, सतीश सपकाळे, बापू महाजन, किरण कोलते, किशोर पाटील, अमोल इंगळे, मुकेश गुंजाळ, पिंटू ठाकूर, सोनी संतोष बारसे, अजय नागराणी, निकी बत्रा, देवा वाणी, दिनेश नेमाडे, राजेंद्र आवटे, अभियंता एस.यु.कुरेशी, रमाशंकर दुबे, रवी निमाणी, सुनील राखुंडे, महेंद्र अग्रवाल, योगेश पाटील, विनय बढे, ऍड निर्मल दायमा, रायसिंग पंडित, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

Protected Content