मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांच्या कंपनीत २९ कोटींचे मनी लॉंड्रींग : सोमय्यांचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटकर यांच्या कंपनीत २९ कोटी रूपयांचे मनी लॉंड्रींग झाले असून यातून ठाकरे पिता-पुत्रांसोबत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 

किरीट सोमय्या यांनी आधी जाहीर केल्यानुसार आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.ते म्हणाले की, दादर येथील शिवाजी पार्कमध्ये श्री जी पार्क ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कंपनी असून त्यात २९ कोटी रुपयांचा काळा पैसा पुरवण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांशी निगडीत या कंपनीत मोठ्या प्रमाणावर मनी लॉंड्रिंग झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

सोमय्या पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे , तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांच्यासोबत चतुर्वेदीचे अनेक व्यवहार झाला. मी तपास अधिकार्‍यांशी चर्चा केली. चतुर्वेदी गायब आहे. ठाकरे सरकारचे कौटुंबिक मित्रं आहेत. त्यांना फरार घोषित करा ही आमची मागणी आहे. ज्यांनी कोट्यवधी रुपयांचा पैसा पार करण्यात मदत केली. दीड डझनहून अधिक कंपन्या केल्या. मनी लॉन्ड्रिंग केली. ते चतुर्वेदी सापडत नाहीत. पुढच्या काही दिवसात ईडी कंपनी मंत्रालय त्यांना फरार घोषित करतील आणि त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करतील असा विश्वास आहे. नंदकिशोर चतुर्वेदीच्या दीड डझन कंपन्याची यादी आहे. त्यात दोन डझन आणखी कंपन्या बाहेर आल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि चतुर्वेदी यांच्या तीन कंपन्याचा व्यवहार झाला होता. त्याची माहिती मी दिली होती. ७ कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालं. त्यावर ठाकरे कुटुंबाकडून एकही शब्द काढला नाही. त्यामुळे ठाकरे कुटुंब मनी लॉन्ड्रिंगमध्ये चतुर्वेदीचा वापर करत आहे का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या. श्रीधर पाटणकर यांनी श्रीजी होम्स ही कंपनी स्थापन केली. ही पार्टनरशीप कंपनी आहे. दोन पार्टनर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत. वांद्रे येथे कंपनीचं कार्यालय आहे. शिवाजी पार्कात मोठी इमारत उभी केली आहे. कोट्यवधीची इमारत आहे. या श्रीजी होम्समध्ये २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आले आहेत. दोन इंट्री झाल्या. एक ५ कोटी ८० लाख ८६ हजार ९०२ आणि दुसरी एन्ट्री २३ कोटी ७५ लाख ४८ हजार ४१८ ची झाली आहे. काळे पैसे या कंपनीत आले. या कंपनीत मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी कोणत्या चतुर्वेदीची मदत घेतली. उद्धव ठाकरे यांनी या कंपनीशी आपला काय संबंध हे सांगण्याचे आव्हान देखील किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Protected Content