स्त्रियांचे उद्धारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – डॉ. नाडेकर

भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हजारो वर्षाच्या रूढी परंपरेच्या जोखडातून महिलांची सुटका करून त्यांच्या उन्नती आणि विकास साधण्यासाठी संविधानात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत तरतुदी करून खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांचा उद्धार केला असे प्रतिपादन डॉ. आर. एस. नाडेकर यांनी केले.

 

ते  भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या दहा अधिक दोन एन.एस.एस तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डॉ. नाडेकर यांनी पुढे सांगितले की, स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी महिलांना अधिकार प्राप्त करून दिले. महापुरुष कोणत्या जाती-धर्माचे नसतात. सर्वांचे कल्याण हा त्यांचा उदात्त हेतू असतो.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. उत्तम सुरवाडे हे होते. विचार मंचावर पर्यवेक्षिका शोभा तळेले, समन्वयक प्रा. टी. एस. सावंत, प्रा. स्वाती पाटील, प्रा. एन. वाय. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्य हस्ते माल्यार्पण करण्यात आली. महिलांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करून भारतीय संविधानात बाबासाहेबांनी केलेल्या तरतुदींचा विश्लेषण उत्तम सुरवाडे यांनी केलं. भारतीय संविधान जगातला सर्वश्रेष्ठ संविधान असून विविध जाती ,धर्म पंथाच्या, वर्णाच्या, वर्गाच्या लोकांना एकतेच्या धाग्यात बांधून ठेवण्याचं सामर्थ्य घटनेत असल्याचं त्यांनी याप्रसंगी विशद केलं. बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल भविष्यात महिला वर्गाने पुढाकार घेऊन जयंती उत्सव कार्यक्रमाचे नियोजन करावं ,अशी अपेक्षा याप्रसंगी त्यांनी बोलताना व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. रमा मसानी यांनी केलं. आभार प्रा. एच. बी. राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेसेज समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महेश सरोदे, प्रा. जे. डी. धांडे, प्रा. व्ही. डी. सावकारे, प्रा. एल..पी. टाक आदींनी कामकाज पाहीले.

Protected Content