शिवजयंती दिनी ड्राय डे घोषीत करावा; नियाज अली भैय्या फाऊंडेशनची मागणी

जळगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस शिवजयंतीच्या दिवशी ड्राय डे घोषीत करावा  अशी मागणी शहरातील नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, आदर्श, शीलवान व निर्व्यसनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस संपूर्ण शिवप्रेमींसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. शिवजयंती सर्व जाती, धर्म व पंथाचे लोक आप आपल्या परीने अत्त्यंत उत्साहात, जल्लोषात देश व समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करतात. महाराजांना एक आदर्श, निर्व्यसनी समाज अपेक्षित होता. अनेक महापुरुषांच्या जयंती च्या दिवशी ड्राय डे घोषित करून त्यांच्या व्यक्तिमत्व, कार्य, विचारसरणी चा सम्मान करण्यात येऊन त्यांना मानवंदना देण्यात येते.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस शिवजयंती 19 फेब्रुवारी 2021 शुक्रवार रोजी कृपया ‘ड्राय डे’ घोषीत करावा अशी मागणी नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी आधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना निवेदन देवून केली आहे.

या निवेदनावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली, हाजी शेख सलीमुद्दिन, शेख शफी ठेकेदार, सूरज गुप्ता, नाझीम कुरेशी, शेख अबुल जुम्मन, शेख कुरबान, शाकिब फारुख, शेख नझींरुद्दीन, शेख सलमान, शेख अदनान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content