नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत यशस्वी खेळाडुंचा सत्कार

पाचोरा, प्रतिनिधी । नुकत्याच गुजरात येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत जामनेरतालुक्यातील पाळधी येथील १० च्या १० तरुणांनी यश संपादन करुन पाळधी नगरीच्या मुकुटात मानाचा तुरा रोवल्याबद्दल पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल संचालक डॉ. सागर गरुड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत वैभव सोनवणे (कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल), अल्ताफ तडवी (कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल), जितेंद्र धनगर (कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल), वैभव पाटील (१०० मी. हर्डल स्पर्धेत गोल्ड मेडल), करण बारी (१००मी. धावणे स्पर्धेत गोल्ड मेडल), महेश पाटील (४०० मी. हर्डल्स स्पर्धेत गोल्ड मेडल), अतुल परदेशी (११० मी. धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल), पवन काळे (१५०० मी. धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल), गणेश पाटील (लांब उडी स्पर्धेत सिल्वर मेडल), भूषण परदेशी (५ मी. धावणे स्पर्धेत ब्राँझमेडल) मिळाले आहे. त्यांना प्रशिक्षण देणारे अक्षय राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांतर्फे डॉ.सागर गरुड यांचा देखील सत्कार करण्यात आला. तेव्हा युवासेना  उपजिल्हाप्रमुख विश्वजित पाटील, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील,  ग्रामपंचायत सदस्य  सचिन पाटील, मुख्याध्यापक पी. एस. पाटील, पोलिस पाटील प्रविण पाटील, वि. का. सोसायटीचे चेअरमन योगेश सुशिर, वेब मेडिया असोसिएशन जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया, माणुसकी ग्रुप जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, अमोल करवंदे, संदीप पाटील, गणेश पाटील, हितेश पाटील, किरण पाटील, जसवंत परदेशी, ईश्वर चोरडिया, गोपाल वाणी, शांताराम लोहार, गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.  डॉ. सागर गरुड यांनी खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत शाल, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

यावेळी डॉ. सागर गरुड यांनी तरुणांनी आपल्या  सुप्तगुणांना वाव देऊन यश संपादन करावे असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, तरुणांना उपजत गुण लाभलेले असतात. जामनेर तालुक्यात सर्वात जास्त तरुण स्पर्धात्मक परीक्षा, सेना भरती, पोलीस भरती, राज्य राष्ट्रीय स्पर्धा यामध्ये सहभाग घेतात. यामध्ये पाळधी गावातील तरुण यशस्वी झालेले आहेत. पाळधी हे तरुणांचे गाव आहे सगळे तरुण हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा यश संपादन करून आले हे अभिनंदनीय आहे व आम्हाला गर्व आहे व तुम्ही यशस्वी उंच शिखर गाठा व समाजाचे नाव मोठे कराल असी अपेक्षा व्यक्त केली. 

 

Protected Content