पिंपळगाव-शिंदाड गटात आ. किशोर पाटीलांनी घेतले जनतेचे आशीर्वाद

kishor patil pimpalgaon

पाचोरा प्रतिनिधी । येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पिंपळगाव-शिंदाड या भागात प्रचार दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले. आमदार किशोर पाटील यांच्या दौऱ्याला जनतेने  आशीर्वाद देत पुन्हा आप्पा तुम्हीच पुन्हा निवडून येणार असल्याचे आश्वासन दिले.

हरी हरेश्वर पिंपळगाव येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात जाऊन माउलीचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रचार दौऱ्यात आमदार पाटील हे मतदार संघातील जनतेचे माता भगिनींचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेत आहेत. आजच्या पिंपळगाव हरेश्वर या गावातील दौऱ्यात आमदार किशोर पाटील यांनी विविध विकास कामे केल्याचा दावा करीत, मतदार संघ सुफलाम सुजलाम करण्यासाठी पुन्हा विजयाचे आवाहन करीत आहेत.

या प्रचार दौऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या सोबत माजी जि.प.सदस्य उद्धव मराठे, भाजपाचे जि.प.सदस्य मधुकर काटे, कोमल देशमुख, सलीम मेम्बर, विशवनाथ लोहार, शांतीलाल डॉक्टर, विनोद महाजन, भगवान पाटील, बाजीराव गीते, किरण टेलर, रवि गीते, अण्णा तेली, मिलिंदशेठ देव, राजबाबू तेली, डॉ.सुनील माळी, प्रितेश जैन, अक्षय जैन, समाधान पाटील, भागवत पाटील, सुनील क्षीरसागर, शंकर गोरे, निंबादास माळी, जितू महाजन, संतोष पाटील, नाना सरकार, राजू मालकर,सुदाम पाटील, मुकेश चौधरी,राहुल चौधरी, समाधान हटकर, राकेश वाघे,गजू पोतदार, अतुल सूर्यवंशी, अलाब तडवी, अशपाक बागवान, राजू मराठे,पदमाकर बडगुजर, असलम पठाण, प्रशांत माळी, राजू बोरसे, कैलास क्षीरसागर, के.टी.पवार, राजधर मालकर, सुरेश पंचशील, माधवराव सांडू, नत्थूआप्पा तेली, रघूनाथ पाटील, नितीन चौतमल, पंढरीकाका सावळे, राजू देशमुख आदी भाजपा शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content