सद्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे देशाचे भवितव्य अंधारात – डॉ. मनमोहन सिंग

manmohan sing

 

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मनमोहन सिंग आज मुंबईत आले आहेत. ‘काँग्रेसच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच मदत करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करून त्यांना दिलासा दिला गेला. मात्र, सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे आणि आर्थिक मंदीमुळे देशाचे भविष्यच अंधारात गेलेय. असा आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी यावेळी केला.

तसेच डॉ. मनमोहन सिंग पुढे बोलतांना म्हणाले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र गंभीर आर्थिक संकटात आहे. राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्य असून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारची लोकविरोधी धोरणे यास जबाबदार आहेत,’ असा घणाघाती आरोपही सिंग यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी आज पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मनमोहन यांनी यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांवर सडकून टीका केली. ‘काँग्रेसच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच मदत करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करून त्यांना दिलासा दिला गेला. मात्र, सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळं आणि आर्थिक मंदीमुळं देशाचं भविष्यच अंधारात गेलंय’. दरवाढीवर नियंत्रण राखण्याच्या हट्टाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आयात-निर्यात धोरणालाही झळ बसली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच असून महाराष्ट्र याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे, ही दुर्दैवाची बाब आहे,’ असे मनमोहन सिंग म्हणाले.

Protected Content