डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आकाशकंदील प्रदर्शन (व्हिडीओ)

dr. aachraya

जळगाव प्रतिनिधी । आगामी दीपोत्सवानिमित्त शहरातील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात कार्यानुभव विषयांतर्गत आज (दि.17) विद्यार्थ्यांनी आकाशकंदील शिकवून, तयार झालेले आकाशकंदीलचे प्रदर्शन भरविण्यात आले.

मुलांमधाल सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी आज कार्यानुभव विषयांतर्गत आकाशकंदील मेकिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आकाशकंदील बनवण्यासाठी रंगीबेरंगी कार्डशीत, घोटीव कागद, मणी, लोकर, टिकल्या, टाकावू पासून टिकाऊ वस्तूचा वापर यात करण्यात आला. शखु प्रकार, चांदणी, पंचकोनी, लंबगोलाकार, चौकोनी इत्यादी प्रकारचे असे 175 आकाशकंदील विद्यार्थ्यांनी तयार केले. यानंतर त्या आकाशकंदीलांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच केतन वाघ, कविता पाटील, प्रमोद इसे, वंदना सावदेकर, योगेश जोशी यांचे सहकार्य लाभले.

पहा : विद्यार्थ्यांनी तयार केले आकाशकंदील

Protected Content