यावल येथे आरोग्य प्रशिक्षण वर्ग उत्साहात

 

यावल प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा समाजाव्दारे संचलीत विद्या प्रसारक मंडळ संचलीत यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आरोग्य प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान येथील कला , वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात यावल तालुका आरोग्य विभागाच्या वतीने टी. बी. मुक्त भारत व मातृवंदना प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.असे सामाजिक व समाजहिताच्या प्रबोधनकारक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने संस्था व महाविद्यालयाच्या वतीने बहुउद्देशीय हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिला जातो.

सदर प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाला यावल तालुक्यातील २५० च्या जवळपास आशा आरोग्य सेविकांनी आपला सहभाग नोंदविला सदर कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे या होत्या . कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. तडवी व त्यांचे सहकारी हजर होते.

कार्यक्रमास कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार व उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील हजर होते व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्वाचे सहकार्य केले.

 

 

Protected Content