आशादीप वसतिगृहातील वादग्रस्त प्रकरणाची चौकशी करा

 

जळगाव,प्रतिनिधी । आशादीप वसतीगृहातील मुलीचे  वादग्रस्त प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना बुधवार दि. ३ मार्च रोजी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. 

निवेदनाचा आशय असा की, गणेश कॉलनी येथील आशादीप मुलीचे वसतिगृहात दोन मुलींमध्ये वाद झाले होते. यात पारोळा येथील एका मुलीस वसतीगृहातील अधिकारी व कर्मचारी तेथील मुलींना योग्य वागणूक देत नसल्याची तक्रार केली आहे. व तिला ही तक्रार पोलिसांत नोंदवायची असून तिची तक्रार नोंदवून घेण्यात यावी. तसेच एका मुलीवर अत्याचार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरी पिडीतेचे म्हणणे एकून झालेल्या प्रकारची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर महिला मोर्चा अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, महिला मोर्चा सरचिटणीस रेखा वर्मा यांची स्वाक्षरी आहे. निवेदन देतांना महापौर सौ. भारती सोनवणे, महिला आघाडी सरचिटणीस रेखा वर्मा, नितु परदेशी, मंडळ अध्यक्ष उषा पाठक आदी उपस्थित होते. 

 

Protected Content