कुंभार खोरीत वणवा ; अग्निशमन दलाच्या दीड तासांच्या प्रयत्नांनी आटोक्यात

 

जळगाव, प्रतिनिधी । आज सकाळी महाबळ परिसराजवळील कुंभार खोरी येथे पोलीस फायरिंग करतात तेथे वणवा पेटला असता अग्निशमन दलाच्या पथकाने दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी तो आटोक्यात आणला. 

आज सकाळी १०.४० वाजता पोलीस कंट्रोल रूम येथून अग्निशमन विभागास महाबळ परिसरा जवळील कुंभार खोरी येथे पोलीस फायरिंग करतात तेथे वणवा पेटला असल्याची खबर देण्यात आली असता अग्निशमन दलाच्या पथक रवाना झाले. यात लांडोर खोरी परिसरातील कुंभार खोरी येथे  पोलीस फायरिंग करतात त्या भागात वणवा पेटला होता. याबाबतचे वृत्त पोलीस कंट्रोल रूममधून कळल्यावर अग्निशमन दलाचे जवान तत्काळ रवाना झाले. हा परिसर ओबड खोबड असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.  अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी ही दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी आटोक्यात आणली. वणवा विझविण्यासाठी अग्निशमन विभागातील कर्मचारी- नासिर अली, राजेश चौधरी, नितीन बारी, पन्नालाल सोनवणे, राजमल पाटील, युसूफ पटेल, मोहन भाकरे, संतोष पाटील यांनी प्रयत्न केलेत.

 

Protected Content