केरळ, तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही परत आणा – ॲड. जयप्रकाश बाविस्कर

जळगाव प्रतिनिधी । कोटा प्रमाणे केरळ व तामिळनाडू येथे राज्यातील एकुण १८०० रेल्वे प्रशिक्षणार्थी अडकले आहे. यांना राज्यात परत आणण्यासाठी सरकाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मनसेचे माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी मेलद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच कोटा (राजस्थान) येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारने साकारात्मक पाऊल उचचली त्याप्रमाणे केरळ आणि तामिळनाडू राज्यात महाराष्ट्रातील तब्बत १८०० रेल्वे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी अडकले आहे. देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटात लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील असंख्य रेल्वे प्रशिक्षणार्थी Southern railway मध्ये ज्यात मुलींचा देखील समावेश आहे. त्यातीलच एर्नाकुलम ज. केरळ आणि नागरकोइल ज. तामिळनाडू या शहरामध्ये १८०० प्रशिक्षणार्थी अडकले असल्याचे समजते. त्यात ०४ मुलींचा ही समावेश आहे. यादरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा अॅपेंटीसशिप कालावधी १३ एप्रिल २०१९ ते १२ एप्रिल २०२० संपलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. त्यांना पुरेस अन्न पाणी मिळत नाहीय,जीवनावश्यक वस्तूंची ही पूर्तता नाहीय,पैसे ही नाहीत. त्यामुळे अडकलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची परिस्थिती खराब झाली आहे.

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील अडकलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आपापल्या घरी आणण्यासाठी कृपया नियोजन करावं आणि लवकरात लवकर अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या महाराष्ट्रात आणावे, अशी मागणी मनसेचे माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ई-मेल द्वारे मागणी केली आहे.

Protected Content