मातोश्री दूर राहिलं, शाखा प्रमुखांच्या घरासमोर आरती करून दाखवा; उदय सामंत यांचे आव्हान

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । ‘राणे दाम्पत्याला आव्हान आहे की, मातोश्री दूर राहिलं, अमरावतीच्या एखाद्या शिवसेना शाखा प्रमुखाच्या घरासमोर आरती करावी, हनुमान चालिसा म्हणावा असे आव्हान शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करावे, अन्यथा मी आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राणा दांपत्याचा अमरावतीमधील गंगा सावित्री या निवासस्थानासमोर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले होते. मात्र पोलिसांनी त्यांना आधीच अडवले.

यावेळी उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर टिका करणे हे आज कालचे फॅशन झाले आहे. ज्यांच अस्तित्व संपले आहे. जे अनेक पक्ष फिरून आलेल्यांना पक्षात कुणी महत्व देत नाही, अश्यांना आपला टीआरपी वाढविण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर काहीही मुलाखती देतात. अशी टिका अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यावर टिका केली. मातोश्री तर दुर राहिलं, अमरावतीतील एखाद्या शाखा प्रमुखाच्या घरासमोर जाऊन आरती करावी हनुमान चालिसा म्हणावी. ती तारीख आणि वेळ माझ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला द्यावी” असाही टोला सामंत यांनी लगावलाय.

Protected Content