पालकमंत्र्यांचा पाठपुरावा : जिल्ह्यातील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी निधी मंजूर

जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूजप्रतिनिधी | राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत जळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने ९ कोटी ४० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील अल्पसंख्याक बांधवांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून त्यांना आभार पत्र दिले आहे.

 

राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या ३१ मार्च २०२२ रोजीच्या निर्णयाद्वारे नागरी विभागासाठी ४ कोटी ५५ लाख रुपये तर ग्रामीण विभागासाठी ४ कोटी ८५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून १० लग्नमंडप, सभागृह आणि ९ स्मशानभूमीची कंपाउंड वॉल बांधण्यात येणार आहे. याशिवाय काही ठिकाणी पक्के नाले, काँक्रिटचे रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. सुमारे १० कोटींच्या निधीतून अल्पसंख्याक समाजाची ५४ विकास कामे होणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील याच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक समाजासाठी मोठी रक्कम मंजूर केल्याने जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. त्यानिमित्त विविध शहरातील लोक पालकमंत्र्यांचा सत्कार करत आहेत. या संदर्भात जळगावच्या अमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सय्यद शहीद, कादिरिया फाऊंडेशनचे अध्यक्ष फारूख कादरी, मेमन जमातचे शकील मेमन, पाळधीचे सरपंच हाजी सुलतान पठाण, मन्यार समाजाचे अल्ताफ शेख, खाटीक बिरादरी युवा अध्यक्ष यासर अराफत, अमन जमातचे अध्यक्ष आ. फर्दी अमान सय्यद (साहिल), मन्सूरी बिरादरीचे वसीम मन्सूरी, एमएसईबीचे जिया शेख, रिक्षा युनियनचे निसार खान, शाहिद खान, शादाब खान, शौकत पेंटर, अमळनेरचे मुस्लिम युवक अध्यक्ष रियाजुद्दीन रुकनोद्दीन शेख, अमळनेरचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू शेख, चोपडा येथील सय्यद साजिद आदींनी पाळधी येथील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अल्पसंख्याक समाजाचा मोठा निधी.राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्याबद्दल त्यांचे आभार.

Protected Content