मधुमेह आजारावरील चर्चासत्राचे आयोजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आय.एम.ए.जळगाव व आय.एम.ए ए.एम.एस.जळगाव या संस्थेतर्फे रविवार दि. १७ एप्रिल रोजी मधुमेह (डायीबेटीस) या आजारावरील नवीन संशोधन व चर्चासत्र हे आयोजित करण्यात आले होते. यात शहरातील १५० सदस्य सहभागी झाले होते.

 

मधुमेह (डायीबेटीस) या आजारावरील नवीन संशोधन व चर्चासत्रात डॉ. चिमु चोपडे यांचे डायीबेटीस वरील औषधोपचार, डॉ.अमित भंगाळे यांचे डायीबेटीस व किडनी , डॉ.हर्शल पाटील यांचे डायीबेटीस व हृदय, डॉ.स्नेहल फेगडे यांचे डायीबेटीस व पायांचे आजार असे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. जळगाव शहरातील सुमारे १५० सदस्यांनी याव्याख्यानाचा लाभ घेत नवीन उपचार पद्धती जाणून घेतली. यावेळी उपस्थित सदस्याच्या शंकाचे समाधान व्याख्यात्यांनी उत्तम प्रकारे केले. व्याख्यानाच्या आयोजनात स्पंदन हार्ट सेंटरचे डॉ. हर्षल पाटील यांचे सहकार्य लाभेल. कार्यक्रमाचे नियोजन डॉ.रुपाली बेंडाळे, डॉ. राहुल चिरमाडे यांनी केले. जळगाव आयएमए अध्यक्ष डॉ दिपक आठवले, जळगाव आयएमए सचिव डॉ जितेंद्र कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची मान्यता घेण्यात येवून उपस्थित सदस्यांना २ गुण बहाल करण्यात आले. डॉ. सुयोग चोपडे यांनी आभार मानले.

Protected Content