प्रशांत अग्रवाल यांनी स्वीकारली सीए शाखेच्या अध्यक्षपदाची सूत्रे

जळगाव प्रतिनिधी । येथील सीए शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल यांची निवड करण्यात आली असून आयसीएआय भवनातील कार्यक्रमात त्यांनी मावळते अध्यक्ष सागर पाटणी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.

जळगाव सीए शाखेचा पद हस्तांतरण कार्यक्रम रविवारी आयसीएआय भवनात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे व माजी खासदार ईश्‍वरलाल जैन व नागपूर येथील सीए अभय अग्रवाल यांची उपस्थिती होती.

यात नवीन कार्यकारीणीने पदभार स्वीकारला. नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रशांत अग्रवाल, उपाध्यक्ष आणि सचिव सौरभ लोढा, कोषाध्यक्ष आणि विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष विकी बिर्ला यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष सागर पाटणी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांच्याकडे पदभार दिला.

माजी अध्यक्ष पाटणी यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला. नूतन अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी नवीन वर्षात कोविड नियमांचे पालन करुन कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी १० रोजगार मार्गदर्शन प्रकल्प हाती घेऊ असे सांगितले. सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २५ नवीन सीएंचे आमदार भोळे व माजी खासदार जैन यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव केला. पदग्रहणनंतर फेसलेस इन्कम टॅक्स असेसमेंट या विषयावर चर्चासत्र झाले. ममता राजानी यांनी सूत्रसंचालन केले.

Protected Content