कोरोनामुळे रिक्षा चालक घेणार खबरदारी : सावरकर रिक्षा युनियनचा ठराव

जळगाव प्रतिनिधी । शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने रिक्षा चालकांनी खबरदारी घेण्याचा ठराव वीर सावरकर रिक्षा युनियनच्या बैठकीत घेण्यात आला.

वीर सावरकर रिक्षा युनियनची बैठक संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने रिक्षात प्रवासी बसवताना मास्क असेल तरच प्रवाशी बसवण्यासह रिक्षामध्ये सॅनिटायझरसह चालक व प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टन्ससाठी प्लास्टीकचे पडदे लावण्यात यावे. यासह पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने प्रवास भाडे हे १० ते १५ रुपयांवरून १५ ते २० रुपये करण्याचे ठराव संमत करण्यात आले.

दरम्यान, याआधी जिल्हाधिकारी, आरटीओ व नगरपालिका अभियंत्यासोबत झालेल्या ङ्गस्टॉप टू स्टॉपफ सर्व्हेनुसार मीटरप्रमाणे भाडे ठरवून दिले होते; मात्र शहरातील प्रवासी मीटरप्रमाणे प्रवास न करता शेअर पद्धतीने करतात. त्यामुळे केवळ पासिंगसाठी मीटरची सक्ती करू नये. यासह इलेक्ट्रिक मीटर दुरूस्तीची सक्ती नसावी. या कामासाठी दीड हजार रूपयांचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी ही रिक्षाचालकांनी बैठकीत केल्या.

तर, रिक्षा पासिंगसाठी इलेक्ट्रिक मीटर, मीटरमध्ये १६चा आकडा दिसणे आवश्यक यासह अनेक नियम लावले जात आहे. त्यामुळे पासिंगसाठी ५०० रुपये खर्च करावे लागतात. यासह इलेक्ट्रिक मीटर दुरुस्तीची सक्ती, वाढलेली इन्शुरन्सची बोझा याविषयी माहिती देऊन याबाबत प्रशासनाकडे दाद मागण्याचे ठरवण्यात आले आहे.

या बैठकीला दिलीप सपकाळे यांच्यासह अशोक चौधरी, एकनाथ बारी, बन्टी चौधरी, शशी जाधव, उत्तम काळे, राजेंद्र चौधरी, रवींद्र हळदे, प्रभाकर महाजन, नरेंद्र कोलते, संजय पवार, नितीन शिंदे, रवींद्र ठाकरे, गुणवंत अडकमोल, विनोद पाटील, अजय सोनवणे, सागर दिक्षीत आदी रिक्षा चालक उपस्थित होते.

Protected Content