उजाड कुसुंबा गावात फक्त कागदोपत्री कामे; चौकशीच्या मागणीसाठी मनसेचे उपोषण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उजाड कुसुंबा या गावात गेल्या काही वर्षांमध्ये विकासकामांसाठी ३ कोटी ८० लाखांचा निधी खर्च करण्यात आला असला तरी ही सर्व कामे कागदोपत्री करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे.

या संदर्भात मनसेच्या रस्ते व आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील उजाळ कुसुंबा या गावातील नागरिकांनी त्यांना शासनाचा कुठल्याही सुविधाचा आज पावेतो लाभ मिळालेला नसल्याने मागील एक वर्षापासून ते पाठपुरावा करीत आहेत परंतु त्यांना याबाबत न्याय न मिळाल्याने ते आमच्याकडे न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडे आले असून याबाबत हे निवेदन सादर करण्यात आले आहे.

यात पुढे म्हटले आहे की,आम्ही संबंधीत गावामध्ये भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी त्यांच्या समस्या बाबत चर्चा केली. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी मला सांगितले की गावामध्ये आजपर्यंत कुठेही पिण्याचे पाण्याची सुविधा नाही पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाबाहेर एक किलोमीटर दूर वरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. गावात सांडपाणी वाहण्यासाठी एकही गटार नाही. त्यामुळे पावसाळ्यात तर संपूर्ण गावामध्ये चिखलाचे साम्राज्य असते. आज पर्यंत गावात एकही रस्ता तयार झालेला नाही. तसेच गाव हे मुख्य हायवे पासून सुमारे चार किलोमीटर दूर आहे. त्यामुळे रात्री अपरात्री कोणी आजारी पडले तर त्यात दवाखान्यांमध्ये नेण्यासाठी पायी चालून जावे लागते. गावात एकही शौचालय नाही. त्यामुळे गावातील आई बहिणींना उघड्यावर शौचास बसावे लागते तसेच घरकुल योजने सुद्धा आजपर्यंत कोणाला मिळालेला नाही. सन २०१६ ते २०२० पर्यंत गावात विविध कामांचे ३ कोटी ८० लाख ३० हजार रूपयांचे कागदोपत्री कामे दाखवून कामे न करता शासनाची फासवणूक केली आहे. या कामांची जिल्हास्तरीय चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/2728311534116183

Protected Content