परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदारांचे पाचोऱ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्या वतीने ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन, नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे यांनी सुचीत केल्यानुसार आंदोलन संपुर्ण जिल्हाभर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने आज दि. ४ जुलै रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 राष्ट्रीय खादय सुरक्षा योजना द्वारा सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फढ प्रोग्राम अंतर्गत ४४० रुपये प्रति क्विंटल कमिशन किंवा मानधन दरमहा ५० हजार रुपये निश्चित करण्यांत यावे, गहू, तांदूळ अंत्योदय कार्ड धारकांना साखर या धान्यावर एक किलो प्रति क्विंटल हॅण्डलिंग लॉस (तूट) देण्यावर

सर्व राज्यांनी तात्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर गहू, तांदूळ व्यतिरिक्त खादयतेल व दाळी दरमहा रेशन कार्ड

धारकांना देण्यात याव्यात, एल. पी. जी. गॅसच्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्हयात कंपनीच्या वितरकांकडून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकाना अंतर्गत रेशन कार्डवर असलेलया एल. पी. जी. गॅस सिलेंडरची विक्री नोंदणी करण्यात परवानगी देवून त्यावर निश्चित कमीशन ठेवण्यात यावे. सिलेंडरचा घरपोच पुरवठा दुकानदारांमार्फत व्हावा, तांदूळ, गव्हाच्या गोण्या भरतांना जुटच्या बारदान मध्ये भरुन देण्याबाबत व प्लास्टिकच्या गोण्या बंद

करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश काढून भारतीय खादय निगमला आदेशित करण्यात यावे, कोरोना महामारीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटूंबाला ५० लाख रुपये आर्थिक स्वरुपात मदत देशपातळीवरुन घोषीत करण्यात यावेत व त्यांना कोरोना योध्दा म्हणून घोषित करण्यात यावे, केंद्र सरकारने वाढविलेले २० रुपये व ३७ रुपये कमिशनची रक्कम सर्व राज्य सरकारने तात्काळ स्वस्त धान्य

दुकानदारांना देण्यात यावी, पश्चिम बंगालच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून सर्वांसाठी अन्न या योजनेअंतर्गत सर्व कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची योजना महाराष्ट्र राज्यात आखण्यात यावी, पुर्ण देशभरात ग्रामीण क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना डायरेक्ट प्रोकुमेंट एजंट म्हणजेच सरकार द्वारा गहू, तांदूळ, आधारभूत धान्य खरेदी अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदाराना खरेदी एजंट घोषित करुन सरकार द्वारा गहू, धान, भरड धान्य, मक्का, ज्वारी, बाजरी गावातच खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी, सल्पाय चेंज मॅनेजमेंट अंतर्गत शासन निर्णयातील अंमलबजावणी तात्काळ होवून स्वस्त धान्य दुकानदारांना ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात पुरविण्यात यावे. यात दोषी असणा-या संबंधीतावर कार्यवाही करण्यात यावी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत वाटलेल्या धान्याचे मार्जीनची रक्कम तात्काळ अदा करावी. या रास्त मागण्यांसाठी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तद्नंतर मागण्यांच्या संदर्भाचे निवेदन तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. सदरचे निवेदन पुरवठा अधिकारी शिर्के यांनी स्विकारले. यावेळी

Protected Content