पाचोरा तहसीलसमोर हरीभाऊ पाटलांचे आमरण उपोषण सुरू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील यांचे आज पाचोरा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या उपचारामुळे दि. १० मे २०२२ रोजी जन्मलेल्या नवजात बाळाला पावडरचे दुध पाजल्यामुळे मयत बाळाची प्रकृती खालावल्यामुळे सदर बाळाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. म्हणून बाळाचा झाला मृत्यू आहे. या बाळाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी येथील बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील यांनी दि. १३ जुन २०२२ रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात केली होती.

त्या अनुषंगाने संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांनी सुरू असलेले आमरण उपोषण तुर्त १० दिवस स्थगित करावे असे लेखी पत्र त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते देवुन विनंती केल्यामुळे हरीभाऊ पाटील यांनी सुरू असलेले आमरण उपोषण त्यावेळी तुर्त १० दिवसांसाठी स्थगित केले होते.

परंतु संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक यांनी १० दिवसांच्या केलेल्या विनंती नुसार कोणतीही योग्य कार्यवाही केली नाही आणि तसा १० दिवसांत कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याने तसेच हरीभाऊ पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांना १० दिवसाची म्हणजेच दि. ३ जुलै २०२२ पर्यंत दिलेली वाढीव मुदत संपली असुन तरी सुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांनी मयत बाळाच्या मृत्यूची कोणतीही दखल घेतली नाही.

दरम्यान, दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही. म्हणून आज दि. ४ जुलै पासुन बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील यांनी पाचोरा तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे

Protected Content