कोरोनायोद्धयांना सरकारी नोकरीत अन्यत्र सामावून घ्या

 

 

बोदवड : प्रतिनिधी- । कोरोना कर्मचारी व अधिकाऱ्यांना आरोग्य यंत्रणेत इतरत्र सेवेत समावेश करू करून त्यांचा रोजगार कायम राहील तसेच राज्याची आरोग्ययंत्रणा अधिक सदृढ करण्यास मदत होईल. अशी मागणी आज बोदवडच्या तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध संस्था व अभियानाच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या राज्यभरातील विविध पदांवरील कोविड सेंटर मध्ये काम करणारे कंत्राटी, हंगामी, रोजंदारी अधिकारी व कर्मचारी वर्गाची सेवा समाप्तीची तयारी शासनाने सुरू केली असून हा या कोरोना योध्यांवर अन्याय आहे

आज बोदवड येथील कोविड सेंटर मध्ये कंत्राटी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन दिले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी मोहम्मद आरिफ ,स्टोअर ऑफिसर अशोक गायकवाड, डेटा एन्ट्री ऑपरेटर अक्षय मोरे, आरोग्य सेविका योगिता सुरलकर, वॉर्ड बॉय संदीप पवार, तुषार वाघचौरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

कोविड सेंटर मध्ये काम करणारे कंत्राटी, हंगामी, रोजंदारी अधिकारी व कर्मचारी वर्गाची सेवा समाप्तीची तयारी शासनाने केल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. अडचणीच्या काळात काम करून आता सेवा समाप्ती केली जात आहे.अशी भावना या कर्मचाऱ्यांमधे निर्माण झाली आहे. जेव्हा नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणारी यंत्रणेत कोणीही काम करायला तयार नव्हते अशा प्रसंगी आपले अमूल्य योगदान देणारे कंत्राटी कर्मचारी यांना आरोग्य सेवेत समावून घेण्यात यावे याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.

Protected Content