विद्यापीठात महापुरूषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महात्मा फुले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले.

 

रक्तदान शिबीराचे उद्घाटन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. रमेश सरदार, प्रा.म.सु. पगारे,  वित्त व लेखाधिकारी रवींद्र पाटील, प्रा. आर.जे. रामटेके, प्रा. जितेंद्र नाईक आदी उपस्थित होते. यावेळी अधिसभा सदस्य प्रा. विशाल पराते, सुरेखा पाटील, विद्या परिषद सदस्य प्रा. रमेश सरदार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रक्तदान शिबिराचे समन्वयक अरूण सपकाळे यांनी केले. आभार मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे यांनी मानले. या शिबिरात ७१ शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, दैनिक वेतनिक आणि विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

 

शिबीराच्या यशस्वीतेसाठी इंडियन रेडक्रास सोसायटी जळगावचे डॉ. अरविंद चौधरी, तिलोत्तमा जोशी, निता पाटील, दिशा पाटील, महेश ओतारी व अन्वर यांच्यासह राजू सोनवणे, सुभाष पवार, विकास बिऱ्हाडे, भिमराव तायडे, विठ्ठल धनगर, निता शिंदे, दिलीप अल्हाट, प्रा. आर.आर. चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

 

प्रतिमा मिरवणूकीचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उद्या शुक्रवार १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा पासून  प्रशासकीय इमारती पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरणूक काढण्यात येणार असून सकाळी १०.३० वाजता प्रा. दीपक गायकवाड, पुणे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणी मधील योगदान’ या विषयावर व्याख्यान होईल.अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.डॉ. व्ही.एल.माहेश्वरी राहतील.

Protected Content