पैश्यांसाठी विवाहितेचा छळ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गहाण ठेवलेल्या घर सोडण्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी तालुक्यातील भोलाणे येथील विवाहितेला छळ केल्याचा प्रकारसमोर आला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भोलाणे येथील माहेर असलेल्या विवाहिता कोमल महेंद्रसिंग सूर्यवंशी यांचा विवाह सुरत येथील महिंद्र जगन्नाथ सूर्यवंशी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर त्यांनी घर गहाण ठेवले होते. त्यानंतर गहाण ठेवलेले घर सोडण्यासाठी माहेरहून पैसे आणावे, यासाठी पती महेंद्र सूर्यवंशी यांनी विवाहितेला मागणी केली. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांचे परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. या रागातून पती महेंद्र याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर याला छळ करण्यासाठी सासरच्या मंडळींनी प्रोत्साहित केले. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर विवाहिता यांनी बुधवार १६ मार्च रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती महेंद्र जगन्नाथ सूर्यवंशी, पुष्‍पा जगन्नाथ सूर्यवंशी, राजश्री अनिल कोळी, प्रवीण अनिल कोळी, वैशाली अनिल कोळी नंदिनी अनिल कोळी सर्व रा. उधना जि. सुरत गुजरात यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक बापू कोळी करीत आहे.

Protected Content