भादली येथे शेतकरी तरूणाला दोन जण‍ंकडून बेदम मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली येथील कुंभारवाडा परिसरात दोन जणांनी शेतकरी तरूणाला मारहाण करत त्याचे डोके फोडल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , भादली येथे गोकुळ शरद जंगले  वय ३० हा तरुण कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहे.  मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोकुळ जंगले हा गावातील कुंभारवाडा येथील दुकानावर पत्नीसाठी स्प्राईटची बाटली घेण्यासाठी गेला. यावेळी गावातीलच नामदेव पांडुरंग कोळी याने दारूच्या नशेत माझ्याकडे का पाहतो या कारणावरून गोकुळ जंगले यास चापटा- बुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी नामदेव कोळी याचा मुलगा राहुल कोळी याने त्याच्या हातातील कड्याने गोकुळ जंगले याच्या डोक्यावर मारहाण केली. यात गोकुळ जंगले याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अशा आशयाच्या गोकुळ जंगले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नामदेव पांडुरंग कोळी  व राहुल नामदेव कोळी  दोन्ही रा. भादली या दोघांविरूध्द नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय जाधव हे करीत आहेत

 

 

Protected Content