होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उत्साह

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात होळी सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होळीचे रंग, लहान मुलांसाठी विविध आकारांच्या पिचकाऱ्यांनी दुकाने सजली आहेत. तर राज्य व जिल्हा प्रशासन निर्देश निर्बंधांनुसार वनविभागाकडून अवैध वृक्षतोडीविरोधात खबरदारी घेतली जात आहे.

 

जिल्ह्यातील संसर्ग प्रादुर्भावमुळे गेल्या दोन वर्षापासून बरेच निर्बंध होते. परंतु यावर्षी संसर्ग तीव्रता कमी झाल्याने बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असे असले तरी रात्री १० वाजेपुर्वीच होळी पेटवण्याचे निर्बंध असून रंगोत्सवाची देखील नियमावली अमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन वर्षानंतर प्रथमच बाजारपेठ सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजल्या असून विविध प्रकारचे रंग, लहान मुलांसाठी विविध आकारातील पिचकाऱ्या तसेच साखरेपासून बनविलेले हार कंगण दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे होलिका दहनासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड केली जाते, ती होऊ नये यासाठी जळगाव वनविभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनमजूर यासह स्थानिक पातळीवर ग्रामस्थांचे गस्ती पथक देखील तैनात करण्यात आले असल्याचे जळगाव वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी यांनी सांगितले.

Protected Content