आंतरराष्ट्रीय युवा चळवळ रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडाचा ऑनलाइन पदग्रहण

चोपडा, प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय युवक चळवळ रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडाच्या आगामी वर्षासाठी नूतन पदाधिकार्यांचा दिमाखदार ऑनलाइन पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

नूतन अध्यक्ष दिव्यांक सावंत यांना मावळते अध्यक्ष डॉ. ललित चौधरी यांनी तर नूतन सेक्रेटरी चेतन याज्ञिक यांना मावळते सेक्रेटरी प्रणय टाटीया यांचे हस्ते पदभार सोपविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी व रोटरी चे प्रांतपाल रोटे.शब्बीर शाकीर, उपप्रांतपाल द्वय रोटे.योगेश भोईटे व रोटे.पूनम गुजराथी यांची खास उपस्थिती होती. पाहुण्यांनी रोटरँक्ट क्लबच्या भरीव कार्याचे तोंड भरुन कौतुक केले. व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व निर्मिती च्या दिशेने युवक चळवळ अग्रेसर असल्याचा आवर्जून उल्लेख केला. कार्यालय उद्घाटन, वृक्षारोपण व संगोपन, पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन, सातपुड्याच्या सुदूर वस्ती, तांडे व पाड्यांमध्ये आदिवासी समाज सोबत दिवाळी, लाॅकडाऊन काळात गरजेच्या वस्तूंचे वाटप, रोटरी महोत्सवात मोलाची भूमिका असे अनेकविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्याचे समाधान असल्याचे मत यावेळी मावळते अध्यक्ष डॉ ललित चौधरी व सेक्रेटरी प्रणय टाटीया यांनी व्यक्त केले.येत्या वर्षभरात चळवळीच्या उद्देशाला अनुसरून भरीव कामगिरी केली जाईल अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष दिव्यांक सावंत यांनी याप्रसंगी दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रितेश पाटील, कोषाध्यक्ष सागर नेवे आदींनी देखील पदभार स्वीकारला.

Protected Content