कर्तव्य म्हणून सेवा करा, उपकार म्हणून करू नका : प्रा. अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

चोपडा, प्रतिनिधी । मी ५० व्या पदग्रहण सोहळाचा साक्षीदार आहे. या कार्यक्रमाची संधी मिळणे माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. कोविड किती दिवस चालेल कोणी सांगू शकत नाही पण वेबिनार ,ऑनलाइन याद्वारे आपण आपले अटॅचमेंट, आपली सामाजिक बांधिलकी जोपासू या आणि निरंतर काम करत राहू या. कर्तव्य म्हणून सेवा करा, उपकार म्हणून करू नका असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले. ते रोटरी क्लबचा ५० वा पदग्रहण सोहळा ऑनलाइन झूम मीटिंगमध्ये बोलत होते.

रोटरी ही सेवाभावी संस्था आहे आणि चोपडा रोटरीने अत्यंते प्रभावी काम केलेले आहे. गौतम बुद्धांनी आपल्याला सेवेचे खरे रूप व व्रत समाजाला दिले आहे. काम करताना सर्वांना सोबत घेऊन चला .युनिटी कायम ठेवावी असा मौलिक सल्ला प्रा अरुणभाई गुजराथी यांनी यावेळी दिला. हा पदग्रहण सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रांतपाल शाकीर शब्बीर ,उपप्रांतपाल योगेश भोळे ,उपप्रांतपाल पुनम गुजराथी यांचे ऑनलाइन पद्धतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी रोटरी अध्यक्ष नितीन जैन यांनी नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांच्याकडे पदभार दिला व माजी मानद सचिव धिरज अग्रवाल यांनी नूतन मानद सचिव ॲड. रुपेश पाटील यांच्याकडे पदभार दिला.प्रास्ताविक मावळते अध्यक्ष नितिन जैन यांनी केले. या नुतन वर्षी रोटरी क्लब चोपडा मध्ये नवीन सदस्य जॉईन झाले त्यांच्या परिचय करून देण्यात आला. त्यात डॉ. पराग पाटील, डॉ. अमोल पाटील, संदीप क्षीरसागर (व्यवस्थापक एस. टी. डेपो चोपडा) ,चंद्रशेखर साखरे, पंकज पाटील ,मनोज पाटील, डॉ. सचिन कोल्हे इत्यादी नवीन सदस्यांचा समावेश होता. .नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव व नूतन मानद सचिव ॲड. रूपेश पाटील यांच्या सत्कार अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी मनोगतात रोटरी अध्यक्षपद माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि माझ्या कारकिर्दीत मी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या ऑनलाईन परिचय त्यांच्या स्नुशा पूनम गुजराथी यांनी मार्मिक शब्दात केला. रोटरेक्टचे मावळते अध्यक्ष डॉ ललित चौधरी यांनी आपला पदभार नूतन अध्यक्ष दिव्यांक सावंत यांच्याकडे सोपविला तसेच मावळते सचिव प्रणय टाटिया यांनी नूतन सचिव चेतन याज्ञिक कडे पदभार सोपविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले तर आभार मानद सचिव रूपेश पाटील यांनी मानले.

Protected Content