भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी हर्षल आंबेकर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्रकार संघाच्या तालुक्यातील हिंगोणा येथील पत्रकार हर्षल आंबेकर यांची तालुका उपाध्यक्ष तर मारूळ येथील पत्रकार सैय्यद चॉंद बादशा यांची लालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अय्युब जी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोणा तालुका यावल येथील ग्राम पंचायत कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत त्यांची ही निवड करण्यात आली आहे. या बैठकीत पत्रकारां संर्दभातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आंबेकर आणी सेव्यद यांच्या निवडीचे संघाचे स्वागत महाराष्ट्र राज्य सचिव जिवन चौधरीं, जळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, शहरी जिल्हा अध्यक्ष सलीम पटेल, उत्तर विभागीय अध्यक्ष चंदकात पाटील व उपाध्यक्ष महेश पाटील, विभागीय समन्वयक रणजीत भालेराव, शहरी क्षेत्राचे उपाध्यक्ष रावण ठाकरे, नरेन्द्र सपकाळे, जिल्हा सचिव गोकुळ कोळी, तालुका अध्यक्ष ए. टी. चौधरी ( पाटील ), मनोज नेवे, बाळासाहेब आढाळे, राजेन्द्र आढाळे, रविद्र आढाळे, सुनिल पिंजारी, नितिन बडगुजर, नितिन झांबरे, फिरोज तडवी, दिपक नेवे, विक्की वानखेडे यांच्यासह आदी पत्रकारांनी केले आहे.

 

 

 

 

Protected Content