Home क्राईम हात पकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

हात पकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0
59


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षी अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ती घराच्या बाहेर अंगणात भांडे घासत असताना त्यांच्या शेजारी राहणारा संदीप रवींद्र पाटील हा तिच्याजवळ आला आणि म्हणाला की, इन्वर्टर वाल्याचा फोन लावायचा आहे मला इन्वर्टर वाल्यांचा फोन नंबर दे असे सांगून ती मुलगी घरात गेली व इन्वर्टरवालाचा नंबरची चिठ्ठी आणून त्याला देत असताना संदीप पाटील याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीने त्याचा हात झटकून ती घरात निघून गेली. संदीप पाटील हा तेथून पळून गेला. दरम्यान सायंकाळी पीडित मुलीची आई वडील घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. तिच्यासह तिच्या पालकांनी पारोळा पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संदी रवींद्र पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.


Protected Content

Play sound