जळगावात मुसळधार पावसाची हजेरी ; नागरिकांची तारांबळ (व्हिडीओ)

jalgaon 1 1

 

जळगाव प्रतिनिधी । शहरात आज (दि.१९) दुपारी ४.३० च्या सुमारास ढगांच्या गडगडटासह मुसळधार पावसाने अचानक हजेरी लावली. जोरदार पाऊस कोसळल्याने बाजारपेठेत आणि रस्त्यावर असलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. थोडा वेळ पण दमदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले होते. शहरातील लेंडीनाल्यासह अन्य लहान-मोठे नाले व गटारी तुडुंब भरून वाहत होते.

गेल्या आठवड्यापासून शहरात रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र दमट वातावरणामुळे हवेत गारवा नव्हता. आज सकाळीही शहरातील वातावरण उष्ण होते. सकाळीही आकाशात काळ्या ढगांनी दाटी केली होती, मात्र ते जोरदार न बरसता केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली. दुपारी मात्र अचानकपणे विजांचा कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी घराबाहेर असलेल्या नागरिकांची व बाजारातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात मात्र गारवा निर्माण झाला होता. शहरातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तसेच रस्त्यांना खड्डे पडल्याने, वाहनधारकांचीही त्रेधातिरपीट उडाली होती. याचबरोबर शहरात बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने, नागरिक आणि व्यावसायिकांची अडचण झाली होती.

Protected Content