अवैध दारू विकणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर परिसरात रिक्षा स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल राधिका येथे लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची विक्री करणार्‍या दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या खोटेनगर रिक्षा स्टॉपसमोर असलेल्या हॉटेल राधिकाच्या बाजूला संशयित आरोपी श्याम अमृत धनगर (वय-३० रा. वावडदा ता.जि.जळगाव) आणि अनिल नारायण सरकार (वय-४५ रा. जळगाव) हे बेकायदेशीर विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती तालुका पोलीसांना मिळाली त्यानुसार पोलीसांनी सापळा रचुन त्यांच्या ताब्यातील सुमारे १७ हजार ७६५ रूपये किंमतीचा दारूचा साठा हस्तगत केला आहे. दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून दोघांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Protected Content