सीए महावीर जैनच्या जामीनावर २३ रोजी सुनावणी

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे सीए महावीर जैन याच्या जामीन अर्जावर २३ रोजी सुनावणी होणार आहे.

बीएचआर पंतसंस्थेतत सुमारे अकराशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुजीत बाविस्कर, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकरे व कमलाकर कोळी यांना अटक करण्यात आली असून हे सर्व जण सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहेत.

बीएचआर प्रकरणातील संशयित महावीर जैन याने जामीन अर्ज सादर केला असून यावर सोमवारी सुनावणी अपेक्षित होती. तथापि, सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी मुदत मागितल्यामुळे आता २३ रोजी म्हणणे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर युक्तिवादास सुरुवात होईल. तर विवेक ठाकरे व सुजीत बाविस्कर यांच्या जामीन अर्जांवर १६ डिसेंबर रोजी सरकार पक्ष म्हणणे सादर करणार आहे. दरम्यान, संशयित असलेल्या कुणाल शहा याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तर या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असणारे बीएचआरचे प्रशासक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवर यांचा शोध अद्यापही सुरू आहे.

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |jalgaon bhr scam | bhr scam\ bhr scam news

Protected Content