चित्राचौकातून पाकीट लांबविणाऱ्या चोरट्यास शहर पोलीसांकडून अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चित्राचौकात ईलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी आलेल्या तरूणाचे पॉकिट चोरून नेल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीस आज शहर पोलीसांनी अटक केली असून पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

धर्मा प्रकाश भावसार (वय-२८) रा. कांचन नगर जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय गणपत राठोड (वय-३७) रा. रामनगर मेहरूण हा तरूण इलेक्ट्रिशिअनचे काम करतो. इलेक्ट्रिक काम घेत असल्याने लागणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील चित्रा चौकातील कृष्णा इलेक्ट्रॉनिक आला. पीओपीचे लाईट व इतर साहित्य खरेदी करीत असतांना पँटच्या मागच्या खिश्यातून अज्ञात चोरट्याने पाकीट लंपास केले. हा प्रकार ६.१५ वाजेच्या सुमारास संजय राठोड यांच्या लक्षात आला. पाकिटात तीन हजार रूपये रोख आणि ड्राव्हिंग लायसन्स होते. 

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.ना. किशोर निकुंभ यांच्या गोपनिय माहितीनुसार पो.कॉ. ओमप्रकाश पंचलिंग, पो.कॉ. रतन गिते यांनी संशयित आरोपी धर्मा प्रकाश भावसार (वय-२८) रा. कांचन नगर याला अटक केली असून चौकशी अंती पाकीट मारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय रविंद्र बागुल करीत आहे.

 

Protected Content