माहिती देण्यास तीन वर्षे विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यास तीन हजारांचा दंड

rti

धरणगाव, प्रतिनिधी |तत्कालीन जन माहिती अधिकारी मधुकर सूर्यवंशी यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती विहित मुदतीत न दिल्याने त्यांच्यावर ३,००० रुपयांची शास्तीची कारवाई माहिती आयोगाने केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, धरणगाव नगरपरिषद कार्यालयातील तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा नगर अभियंता मधुकर प्रल्हाद सूर्यवंशी यांच्याकडे प्रशांत पुरुषोत्तम गांगुर्डे यांनी माहितीच्या अधिकारात १ ऑगस्ट २०१६ व ३ ऑगस्ट २०१६ रोजी माहिती मागितली होती. परंतु, सूर्यवंशी यांनी ती माहिती तब्बल तीन वर्ष उशिराने म्हणजेच २ ऑगस्ट २०१९ ला अपिलार्थी यांना दिली. म्हणजेच तत्कालीन जन माहिती अधिकारी यांनी अपिलायास माहिती देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केल्याचे स्पष्ट होते असे आयोगाने नमूद केले आहे. म्हणून त्यांना माहितीचा अधिकार अधिनियमानुसार ३,००० रुपयांची शास्ती भरण्याचे आदेश दिले आहेत. ही शास्ती सुर्यवंशी यांच्या वेतनातून कपात करण्याचे आदेश दिले आहेत.

Protected Content