अखेर सुपर ओव्हरच्या नियमात बदल

super over

नवी दिल्ली प्रतिनिधी । विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मूळ सामना अनिर्णित असताना सुपर ओव्हर खेळला गेला. परंतु सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघ एकसारखेच राहिले आणि अखेर मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंडला विश्वविजेता ठरविण्यात आले. त्यानंतर आयसीसीच्या नियमांवर बरीच टीका झाली. आता ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत एक सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार असल्याचा नवा नियम बनवण्यात आला आहे.

वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात येते. यामध्ये दोन्ही संघांना एक-एक अतिरिक्त ओव्हर दिले जाते. यात जास्त धावा करणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येते. सामन्यात जो संघ नंतर फलंदाजीला उतरतो त्या संघाला सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजीची संधी दिली जाते. तसंच फलंदाजी करणारा खेळाडू गोलंदाजी करू शकत नाही. सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली तर जास्त चौकार ठोकणाऱ्या संघाला विजयी घोषित केले जाते. २०१० पूर्वी सर्वाधिक षटकार ठोकणारा संघाला विजयी घोषित करण्यात येत होते.

टी-२०साठीही लागू होणार नवी नियम

नव्या नियमानुसार ग्रुप किंवा लीग सामन्यांमध्ये बरोबरी होत असेल तर तो सामना बरोबरीतच राहील. पण फायनल किंवा सेमीफायनलमध्ये सामना बरोबरीत होत असेल तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यांसाठीही हा नियम लागू असेल. या मुद्द्यावर क्रिकेट समिती आणि सीईसी दोघांचही एकमत झालं. क्रिकेटला अधिक रोमहर्षक बनवण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं, आयसीसीने म्हटले आहे.

वर्ल्डकपमधील वाद

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २१४ धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडनेही २४१ धावा करत सामन्यात बरोबरी साधली. यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी १५-१५ धावा केल्यानंत पुन्हा बरोबरी झाली. यामुळे सर्वाधिक चौकार मारणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात आलं. न्यूझीलंडने १७ तर इंग्लंडने २६ चौकार मारले होते. यामुळे आयसीसीवर जोरदार टीका झाली होती. सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ करत क्रिकेट प्रेमींची मनं जिंकली होती.

Protected Content