Home राजकीय फडणवीस-शिंदे सरकारचा मार्ग मोकळा : लवकरच होणार शपथविधी

फडणवीस-शिंदे सरकारचा मार्ग मोकळा : लवकरच होणार शपथविधी

0
35
fadnavis-shinde

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीची कोणतीही गरज उरली नसून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे लवकरच शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज रात्री पावणेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपतर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. पक्षाच्या सर्व नेत्यांनी पक्ष कार्यालयात पेढे वाटून आनंद साजरा केला. तर यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही मान्यवर अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याचे विरोधी पक्षांनी स्वागत केले. भाजप नेत्यांनी याचा प्रचंड जल्लोष करत स्वागत केले आहे. तर शिवसैनिकांमध्ये मात्र दु:खाचे वातावरण दिसून आले आहे.


Protected Content

Play sound