सीबीआयची रोहन राय याच्यावर पाळत

मुंबई वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या गुन्ह्यात सीबीआयकडून दिशा सालियानचा वाग्दत्त पती रोहन राय याच्यावर पाळत ठेवली जात आहे. या प्रकरणात लवकरच याला समन्स बजावले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणाचा सर्व तपास सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करीत आहे. सीबीआयकडून जवळपास सर्वच संबंधितांची आतापर्यंत चौकशी पूर्ण झाली आहे. पण त्यात ठोस असे काही अद्याप सीबीआयच्या विशेष तपास पथकाच्या हाती आलेले नाही. त्याचवेळी या प्रकरणाचा संबंध सुशांतसिंहची माजी व्यवस्थापक दिशा सालियानशी असल्याचे काही धागेदोरे सीबीआय पथकाच्या हाती लागले आहे. यामुळेच त्या दिशेने तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दिशा सालियानचा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच रोहन राय याच्यावर पाळत ठेवली जात आहे. गरज भासल्यास रोहनला चौकशीसाठी समन्स बजावले जाईल. रोहन सध्या नागपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसारच त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

Protected Content