म्हसावद येथे शालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ धडूराम थेपटे यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त थेपटे मध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता घेण्यात आले. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन डॉ. के.पी. थेपटे यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, म्हसावद ग्रामपंचायतचे सरपंच गोविंदा पवार, पत्रकार दिपक जाधव, दीपक महाजन यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी इयत्ता ५ ते ८ वी (लहान गट) आणि नववी ते बारावी (मोठा गट) या दोन गटात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शालेय महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी ९ वाजता मान्यवरांच्याहस्ते विजेते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत म्हसावद परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्पर्धेत मोठ्या हिरारीने सहभाग नोंदविला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक एस.के भंगाळे, उपमुख्याध्यापक जी.डी. बच्छाव, मुख्याध्यापक एस. बी. सोनार यांच्यासह थेपटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Protected Content