चाळीसगावात वाहतूक शाखेची कारवाई : महिन्याभरात ५ लाखांचा दंड वसूल

चाळीसगाव, प्रतिनिधी  चाळीसगाव शहर वाहतूक शाखेकडून गेल्या महिन्यापासून नो-पार्किंगमध्ये पार्किंग करणाऱ्यां वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. एका महिन्यात २२७९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येवून  ५ लाख २४ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या निर्देशानुसार शहरातील पोलिस ग्राऊंड ते नंदण डेअरी दरम्यान नो-पार्किंगमध्ये पार्किंग करणाऱ्यांवर  १ जूलैपासून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एका महिन्यात २२७९ जणांवर केसेस केले असून ५,२४,२०० (पाच लाख, चोवीस हजार, दोनशे रुपये) दंड आकारला आहे. त्यापैकी १२७ जणांवर कारवाई करून २५,७०० दंड हे वसूल करण्यात आला  आहे.  या कारवाईमुळे वाहतूक शाखेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कारवाईत दुचाकी, फेरीवाले व अवैध वाहतूक आदींचा समावेश आहे. काही अवैध वाहतूक करणाऱ्यांना प्रत्यक्षात न्यायालयाने दंड ठोठावले असून ते अजून न्यायप्रविष्ट आहे. सदर कारवाई हि १ जूलै ते ३१ जूलै दरम्यान करण्यात आली आहे. हि कारवाई सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. दिलीप सोनवणे, स.फौ. राजू मगर, स.फौ. राजेंद्र चित्ते, स.फौ. अरुण बाविस्कर, स.फौ. विजय पाटील, हवा. प्रदीप आहिरे, हवा. नरेंद्र सूर्यवंशी, हवा. बाबा पाटील, हवा. श्रीराम बोरसे, हवा. वंदना राठोड, हवा. राजेश रावते, हवा. हेमंत शिरसाठ, हवा. शांताराम थोरात, पो.ना. सचिन अडवोदकर, पो.ना. भास्कर बोरसे, पो.ना. दीपक जगताप, पो.ना. बापू पाटील, पो.ना. विजय निकम,  पो.ना. राजेंद्र सोनवणे, पो.ना. नरेंद्र पाटील, पो.ना. दीपक पाटील व पो.ना. राजू निकम आदींनी केली.

Protected Content