कत्तलीसाठी बैलाला चोरून नेणाऱ्या तरूणाला पिंप्राळारोड येथून अटक; बैलाची सुटका

जळगाव प्रतिनिधी । कत्तलीसाठी बैल चोरून नेणाऱ्या एकाला शहर पोलीसांनी पिंप्राळा रोडवरील इंदिरानगरातून आज अटक केली. त्यांच्या ताब्यातील बैलाला कुसुंबा येथील गोशाळेत रवाना केले आहे. याप्रकरणी शहर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा रोडवरील इंदीरा नगर येथून आज मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी ९ वाता  एकजण बैल चोरून घेवून जात असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अरूण सोनार, पोहेकॉ विजय निकुंभ, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा मालवणकर, पो.कॉ. उमेश भांडारकर यांनी इंदीरा नगरात गेले असता समोरून एक जण १० हजार रूपये किंमतीचा बैल घेवून येत होता. त्याने पोलीसांची गाडी पाहिल्यानंतर एका खांब्याला बैलाला बांधून पळ काढला. पोलीसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अजमदखान हसनखान (वय-४३) रा. नुरानी मशीदमागे शाहूनगर असे तरूणाचे नाव समजले. त्याची चौकशी केली असता बैला बाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीसांनी ताब्यात घेवून बैलाला शहर पोलीस ठाण्यात आले. ताब्यात घेतलेल्या बैलाला तालुक्यातील कुसुंबा येथील गोशाळेत रवाना केले आहे. याप्रकरणी पोहेकॉ उमेश भांडरकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे. 

Protected Content