लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरे खुली करा : भोसले

नाशिक । राज्य सरकार अनलॉकसाठी नियमावली जाहीर करत अनेक क्षेत्रांना दिलासा दिला आहे. या अनुषंगाने, लसीकरण झालेल्या भाविकांना देव दर्शन करू द्यावे अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी येथे केली आहे.

राज्य सरकारने कालच शासन निर्णय जाहीर करत कोरोनाचा संसर्ग कमी असणार्‍या २५ जिल्ह्यांमध्ये अनलॉकसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या अनुषंगाने आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले म्हणाले की, आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर, लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणी भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

आचार्य भोसले पुढे म्हणाले की, हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या. कोरोना काळात नियम आणि अटींच्या अधिपत्याखाली राहून सगळं काही सुरु असतं. मग मंदिरं उघडी ठेवायलाच काय अडचण होते. हे सरकार हिंदूविरोधी आहे. यांना हिंदूंचं काहीही देणंघेणं नाहीय, अशी टीका तुषार भोसले यांनी केली आहे.

Protected Content