विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क कमी करा; अभाविपचे आमदार भोळेंना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच पालकांच्या रोजगार व उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने  अमदार राजूमामा भोळे यांना निवेदन देवून केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या दीड वर्षांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाऊन काळात शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार व उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यातच आता शाळा व महाविद्यालये शैक्षणिक शुल्क भरण्यास तगादा लावत आहे. अश्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण पध्दती सुरू असतांना ऑफलाईन पध्दतीचे शुल्क आकारले जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने याकडे लक्ष देवून शाळा व महाविद्यालयाकडून भरमसाठ शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावी, परिक्षा शुल्कात कपात करावी, ज्या विद्यार्थ्यांकडून परिक्षा झाली नाही परंतू परिक्षा शुल्क आकारण्यात आले ती फी परत करावी, क्रिडा स्पर्धांमध्ये वयोमर्यादा वाढून मिळावी, गेल्या चार वर्षांपासून रखडलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावी, रखडलेल्या परिक्षा तत्काळ घेण्यात याव्यात, कोरोना आजाराने आई किंवा वडील मृत झालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावी व विद्यापीठाच्या दत्तक योजना लागू करण्यात यावी. अश्या मागण्यात करण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर मंत्री आदेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश महाजन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content