Home क्राईम हरेश्वर नगरात घरासमोरून दुचाकीची चोरी; जिल्हापेठ ठाण्यात गुन्हा

हरेश्वर नगरात घरासमोरून दुचाकीची चोरी; जिल्हापेठ ठाण्यात गुन्हा

0
31


जळगाव प्रतिनिधी । घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शहरातील हरेश्वर नगरात घडली. दुचाकी चोरीप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, ॲड. प्रविण रामेश्वर पांडे (वय-४९, रा. बडोदा बँकसमोर हरेश्वर नगर) हे जिल्हा न्यायालयात वकिली करतात. न्यायालयात जाण्यासाठी त्यांच्याकडे दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीडी ५८२३) क्रमांकाची दुचाकी आहे. रविवारी ४ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता घरासमोर दुचाकी लावली. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत दुचाकी जागेवर होती. सर्वजण झोपलेले असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्याने २२ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. हरेश्वर नगरातील संपुर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. प्रविण पांडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास फिरोज तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound