जगातील प्रत्येक १० व्यक्तींमागे एकाला कोरोनाची बाधा होऊ शकते

जिनिव्हा: वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या दाव्यामुळे चिंता वाढली आहे. या दाव्यानुसार जगातील प्रत्येक १० व्यक्तींमागे एकाला कोरोनाची बाधा होऊ शकते. आता जगातील बहुसंख्य लोक कोरोनाच्या विळख्यात अडकणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

संसर्गाच्या मुद्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारणी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. मायकल रायन यांनी हा इशारा दिला. जगातील मोठ्या लोकसंख्येला संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होणार आहे. संसर्ग कमी करण्यासाठी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. अनेकांचे प्राण वाचवण्यास यश आले असून दक्षिण-पूर्व आशिया भागात बाधितांची संख्या वाढत आहे. युरोप आणि पूर्व भूमध्य सागराजवळील प्रदेशात बाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. आफ्रिका आणि पश्चिम पॅसिफिक भागातील स्थिती अधिक चांगली होती, असेही त्यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती पाहता, जगभरातील १० टक्के लोकसंख्या म्हणजे जवळपास ७६ कोटी जणांना बाधा होण्याची शक्यता आहे. बाधितांची संख्या जेवढी नोंदणीकृत आहे, त्यापेक्षाही अधिक जणांना संसर्ग झाला असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

जगभरात बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ३ तीन कोटी ५२ लाखांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १० लाख बाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक ७४ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. भारतात ६६ लाख जणांना बाधा झाली आहे. ब्राझील तिसऱ्या स्थानावर आहे.

Protected Content