जुमल्यात न अडकता कॉंग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या ; माजी आमदार शिरीष चौधरी

WhatsApp Image 2019 08 07 at 5.08.56 PM 1

रावेर, प्रतिनिधी | बेरोजगारीमुळे युवक..जिएसटीमुळे व्यापारी..तर पाण्याअभावी व भावामुळे शेतकरी त्रस्त असून भाजपावाले ईव्हीएममध्ये गडबडकरून विजय मिळवत आहे. जनतेचा प्रचंड रोष या भाजपा सरकारवर असून अंबानी..अडानी यांना तिकडे जमीनी विकत घ्यायचे असून म्हणून भाजपावाल्यांनी ३७० कलम रद्द करून भावनिक वातावरण निर्माण करत आहे. भाजपावाल्यांमुळे कंपन्या बंद झाल्या असून रेपो दर सातव्या स्थानावर पोहचला आहे. फेकूच्या जुमल्यात न अडकता कॉग्रेस, राष्ट्रवादीला साथ देण्याचे अवाहन माजी आ. शिरीषदादा चौधरी यांनी केले.

रावेर-यावल विधासभा मतदारसंघात कॉग्रेस व राष्ट्रवादीतर्फे दि १० तारखे पासुन ‘जनसंवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी माजी सैनिक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील, ग. स. सदस्य तुकाराम बोरोले, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष निळकंठ चौधरी, कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पं. स. सदस्य योगेश पाटील, प्रतिभा बोरोले, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, माजी सभापती डॉ. राजेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, गयासुद्दीन काझी, राजेंद्र चौधरी उर्फ़े राजू ठेकेदार, भागवत पाटील, अर्जुन जाधव, जगदीश घेटे, गुलाब तडवी, जिजाबराव चौधरी,गोंडू महाजन, गयास शेख, किशोर पाटील, राजेंद्र चौधरी, अॅड. योगेश गजरे, यादवराव पाटील यांच्या सह मोठ्यासंखेने कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधि पदाधिकारी उपस्थित होते.  भाजपामध्ये असलेले बहुजन समाजाचे मुखवटे भाजपावाले संपवत चालले आहे. नाथाभाऊ नंतर चंद्रकांत पाटील यांचा नंबर आहे. जिल्ह्यात ते भाजपात जाण्याची चर्चा असून ती केवळ अफवा असून ते कॉग्रेस पक्षाचे निष्ठांवान कार्यकर्ते असून कॉग्रेसपक्षा कडूनच येथून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

Protected Content