मुख्यमंत्र्यांनी जळगावसाठी पाच वर्षात काय केला याचा लेखाजोखा मांडावा ; डॉ. राधेश्याम चौधरी(व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 08 07 at 6.06.21 PM

जळगाव, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर यात्रा काढून आपल्या पाच वर्षाच्या कामाचा हिशोब मांडण्यासाठी फिरत आहेत. हा हिशोब ,मांडतांना कागदो पत्रीची कामे नव्हे  तर दृश्य स्वरुपाची कामे जमिनीवर दिसली पाहिजेत अशी जनतेची भावना आहे. या यात्रेनिमित्त जळगावात मुख्यमंत्री यांनी जळगावसाठी काय काय केले याचा लेखाजोखा मांडावा असे  जळगाव शहर जिल्हा कॉग्रेस,, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी प्रदेश सचिव अँड. सलीम पटेल, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस माजी उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शशी तायडे, देवा ठाकरे, शाम तायडे, गोकुळ चव्हाण आदी उपस्थित होते.

जळगावकरांनी लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुकीत भरभरून कौल दिलेला असतांना स्थानिक लोकप्रतिनिधी जनतेला विकास कामांद्वारे त्याची परतफेड करू शकले नाहीत असा आरोप डॉ. पाटील यांनी केला आहे. शहराला भेडसावणारे महत्वाचे प्रश्न ते अजूनही सुटलेले किंवा निकाली निघालेले नाहीत. जळगावच्या जनतेला आपण ह्या प्रश्नांना का सोडवू शकले  नाहीत ? आणि आपल्या सरकारने हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय केले ? तेही ते सांगावे असे आवाहन केले आहे. २१७५ गाळेधारकांचा प्रश्न, हुडकोची कर्ज फेड हे विषय अजूनही प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री यांनी जळगाव शहराला २५ कोटी विकास निधी देण्याची घोषणा करून ४ वर्ष झालीत परंतुमं अजूनही ह्या २५ कोटी रुपयांच्या निधीचे विकास कामे पूर्ण झालेली नाहीत. याला कोण जबाबदार ? वरून त्यातून शहरात एल. ई. डी. लावण्याच्या कामाचा काय बट्ट्याबोळ केला आहे. वीज बिल बचत ही नाही ,काम ही अपूर्ण ,जे झालं तेही महागड्या दराने आणि अर्धवटच? मुख्यमंत्र्यांनंतर राज्य सरकारमध्ये प्रभावशाली असलेले एकनाथराव खडसे , चंद्रकांत पाटील आणि आता गीरीश महाजन हयांच्यासारखे नेते गेल्या पाच वर्षात जळगावचे पालकमंत्री असूनही प्रश्न प्रलंबित कसे ? कोणती शक्ती जळगावचे प्रश्न सोडविण्यासाठी अडथळा आणते असा प्रश्न उपस्थित केला आहे. शहराच्या लोक प्रतिनिधी प्रमाणेच ७७९ कोटींच्या कागदी शहर विकासाच्या गप्पा मारणार असाल तर ती जनतेची दिशाभूलच ठरेल. आम्ही जळगावच्या जनतेच्या भावना आमच्या पद्धातीते ,संवैधानिक मार्गाने उद्या प्रत्येक्ष दौऱ्या दरम्यान व्यक्त करणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

Protected Content