वसंतवाडीतून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी येथून घरासमोर उभी ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, वसंतवाडी येथे अरुण काशीदास जगताप (वय-५३) हे वास्तव्यास आहेत. ते शेती करतात. अरुण जगताप यांचा मुलगा उमाकांत याच्याकडे दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे त्याने त्याची (एमएच १२ टीजी २६३०) या क्रमाकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोर उभी दुचाकी आढळून आली नाही. गावात सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने अरुण जगताप यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे हे करीत आहेत.

Protected Content